Advertisement

एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग

लवकरच मुंबईकरांना मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग
SHARES

मुंबईतील खासगी व सार्वजनिक वाहन चालकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी आहे. लवकरच मुंबईकरांना मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. मात्र, या सुविधेसाठी मुंबईकरांना ३ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुंबईकरांचा गाडी पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत लवकरच मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. मोबाईलच्या एका क्लिकवरुन मुंबईत गाडीच्या पार्किंगसाठी जागा अडवून ठेवता येणार आहे. पण या सुविधेसाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. मुंबई महापालिकेनं वाहनतळांच्या नियोजनासाठी तज्ञांची समिती नियुक्त केली आहे. येत्या २०२४ पर्यंत ही समिती मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर अभ्यास करणार आहे.

मुंबईतील पार्किंगची समस्या आणि वाढत्या गाड्या लक्षात घेता वाहनतळांच्या नियोजनासाठी महानगरपालिकेनं वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती वाहनतळ प्राधिकरणाची रुपरेषा बनवणार आहे. त्यासोबतच मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी माहिती पुरविण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

या समितीला कामकाज पूर्ण करण्याची मुदत एप्रिल २०२४ पर्यंत आहे. त्यामुळं पुढील ३ वर्षानंतर मुंबईकरांना मोबाईलवरुन पार्किंगची जागा अडवून ठेवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तसंच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच पार्किंगचं शुल्कही भरण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्याची सोय करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या महानगरपालिका याबाबतचा विचार करत आहे. टाटा समाजविज्ञान संस्थेचे वाहतूक क्षेत्रातील तज्ञ, नगररचनाकार, वाहतूक तज्ञ अशोक दातार, शिरीष जोशी यांच्यासह पालिकेचे निवृत्त अधिकारी निता निफाडे, प्रशांत मोरजकर यांचा या समितीत समावेश आहे. या समितीच्या शुल्कावर महानगरपालिका ४ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे.

या समितीचे नेमकं काम काय? 

  • विभागानुसार वाहानतळांसाठी आराखडा तयार करणार
  • कोणत्या विभागात कोणत्या प्रकारची वाहाने जास्त आहे. म्हणजे अवजड वाहने जास्त असलेल्या विभागात त्या प्रकारच्या वाहनतळांची सोय करण्यात येईल.
  • वाहनतळांसाठी जागा निश्‍चित करणार
  • विभागानुसार आराखडा तयार झाल्यावर ही समिती गरजेच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने वाहानतळांची जागा निश्‍चित करणार
  • जीआय, स मॅपिंग – प्रस्तावित वाहनतळांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे.
  • त्याचा वापर मोबाईल ॲप्लिकेशन बनविण्यासाठी होणार



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा