Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे मंगळवारी दुपारी अर्धा तास बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे मंगळवारी दुपारी एक ते दीड तास बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची केबल टाकण्यासाठी दोन्ही बाजुंनी रस्ता बंद करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे मंगळवारी दुपारी अर्धा तास बंद
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे मंगळवारी दुपारी एक ते दीड तास बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची केबल टाकण्यासाठी दोन्ही बाजुंनी रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवाश करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला समाेर जावं लागणार आहे.

महावितरणची केबल 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचं काम प्रस्तावित आहे. महावितरणची केबल टाकण्यासाठी परंदवाडी या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सर्व प्रकारची अवजड, मालवाहतूक करणारी वाहनं थांबविण्यात येणार आहे. तर, मुंबईकडं जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने ही किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत. तसंच, पुण्याकडं येणारी हलकी, चारचाकी, प्रवासी वाहनं ही उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वळविण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी

मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावली असून जुन महिना असल्यानं अनेक तुरुणाई पिकनिकसाठी भुशी डॅम इथं जातात. अनेक जण टायगर पॉईंट इथं देखील जातात. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे बंद असल्यानं अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.



हेही वाचा -

वैद्यकीय प्रवेश: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा