Advertisement

मुंबईतील ४७ स्थानकांवर लागणार मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर देशातील प्रमुख २०२ रेल्वे स्थानकांवर पहिल्या टप्प्यात एकात्मिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा विस्तार दुसऱ्या टप्प्यात आणखी ४७ स्थानकांचा समावेश आहे.

मुंबईतील ४७ स्थानकांवर लागणार मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर
SHARES

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील ४७ स्थानकांत एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचा (इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टिम) दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. मुंबईतील २६/११ हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत असून स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्याकरीता रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) पश्चिम रेल्वेवरील ३० आणि मध्य रेल्वेवरील १७ स्थानकांत अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर, हातात बाळगता येणारी डिटेक्टर यांसारख्या यंत्रणेचा समावेश आहे.


हल्ल्याला १० वर्षे पूर्ण

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर देशातील प्रमुख २०२ रेल्वे स्थानकांवर पहिल्या टप्प्यात एकात्मिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा विस्तार दुसऱ्या टप्प्यात आणखी ४७ स्थानकांचा समावेश आहे, असं 'आरपीएफ'चे महासंचालक अरुण कुमार यांनी शुक्रवारी चर्चगेट इथं पश्चिम रेल्वे मुख्यालयात सांगितलं.


०.२५ टक्के निधी

रेल्वे सुरक्षेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ०.२५ टक्के निधीची तरतूद करण्यात आल्याचीही माहिती कुमार यांनी यावेळी दिली. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनिंग मशिन, प्रशिक्षित जवान आदींचा एकात्मिक सुरक्षायंत्रणेत समावेश आहे.


पश्चिम रेल्वेवरील स्थानकं

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली, चर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहीम, वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, राम मंदिर, मालाड, कांदिवली, दहिसर, मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार.



हेही वाचा-

मध्य रेल्वेवर रविवारी विशेष जम्बो ब्लाॅक, 'या' गाड्या होणार रद्द

बुडत्या मोनोला जाहिरातींचा आधार!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा