Advertisement

हवाई प्रवासाच्या नवीन गाईडलाइन्स, विमानात मास्क न घातल्यास होणार 'ही' कारवाई

एव्हिएशन रेग्युलेटर, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) यांनी नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे.

हवाई प्रवासाच्या नवीन गाईडलाइन्स, विमानात मास्क न घातल्यास होणार 'ही' कारवाई
SHARES

कोरोना दरम्यान, देशांतर्गत विमान सेवेला परवानगी दिली. मात्र यासोबतच आता एव्हिएशन रेग्युलेटर, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) यांनी नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे. या नियमावलीनुसीर सरकारनं विमान कंपन्यांना विमानात जेवण देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मास्क न घातलेल्या प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाईल.

एव्हिएशन रेग्युलेटर, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) यांनी एअरलाइन्सना सांगितलं आहे की, जर प्रवाशानं मास्क घातला नाही तर ते स्वतःच्या हिशोबानं निर्णय घेऊ शकतात. याशिवाय अशा प्रवाशांचं नाव नो-फ्लाय यादीमध्ये टाकू शकतात. म्हणजेच त्यांच्या हवाई प्रवासावर काही काळ बंदी घातली जाऊ शकते.

हेही वाचा : मुंबई उपनगरीय रेल्वेचं भाडं वाढण्याची शक्यता

हे आहेत नवे नियम

  • डोमेस्टिक फ्लाइटमध्ये पॅक्ड स्नॅक्स, जेवण आणि पेये दिले जाऊ शकतील. इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये गरम जेवणे दिले जाऊ शकेल.
  • एअरलाइन्सला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये सिंगल यूज ट्रे, प्लेट्स आणि कटलरी वापराव्या लागतील.
  • क्रू मेंबर्सना प्रत्येक वेळी अन्न देण्यापूर्वी ग्लोव्ह्ज बदलावे लागतील.
  • फ्लाइटमध्ये प्रवाश्यांना डिस्पोजेबल इयरफोन किंवा निर्जंतुकीकरण केलेले हेडफोन प्रदान करावे लागतील.
  • जर एखादा प्रवासी मुखवटा घालण्यास नकार देत असेल तर एअरलाइन्स त्यांचे नाव नो-फ्लाय यादीमध्ये टाकू शकते.

२५ मेपासून सरकारनं पुन्हा देशांतर्गत विमान सेवेला परवानगी दिली होती. परंतु सुरुवातीला त्यांना फ्लाइटमध्ये जेवण देण्याची परवानगी नव्हती. त्याचबरोबर, विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अंतर ठेऊन प्री-पॅकेज केलेले अन्न आणि स्नॅक्स दिले जात होते.



हेही वाचा

मध्य रेल्वे मार्गावर अखेर क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू

लोकल सेवा सुरू झाली तरी, रेल्वे स्थानकांवर मर्यादित प्रवेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा