Advertisement

गुड न्यूज! मुलुंड-एेरोलीवरून प्रवास करा 'टोल फ्री'!!

सोमवारी ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाच्या माध्यमातून २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मुलुंड आणि एेरोली टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना (दुचाकी, चारचाकी आणि टेम्पो) टोलमुक्ती देण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय वाहनधारकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

गुड न्यूज! मुलुंड-एेरोलीवरून प्रवास करा 'टोल फ्री'!!
SHARES

मुंब्रा बायपास रोडच्या दुरूस्तीमुळं नवी मुंबई-ठाण्यात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात टोलचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. अशावेळी राज्य सरकारनं पुढील महिनाभर ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर खाजगी हलक्या वाहनांना टोलमधून मुक्ती देत दिलासा दिला आहे. ही टोलमुक्ती २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान असेल. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.


कारण काय?

मुंब्रा बायपास रस्त्याची दुरावस्था झाली असून मागील काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. ही दुरूस्ती पूर्ण होऊन रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.

हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यानं वाहतूक इतर पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. त्यामुळं नवी मुंबईकर, मुंबईकर आणि ठाणेकरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेस वाहतूककोंडी इतकी प्रचंड असते की सायन-पनवेल महामार्ग असो वा कळंबोली परिसर इथं २ ते ३ किमीच्या रांगा लागतात.


टोलचा भुर्दंड

वाहतूककोंडीचा त्रास कमी म्हणून की काय म्हणून प्रवासी-वाहनचालकांना एेरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर थांबून टोल भरावा लागतो. मुंब्रा बायपास रस्त्यावरून प्रवास करताना कोणताही टोल लागत नसताना आता नाईलाजाने टोल भरावा लागत असल्याने हा टोल बंद करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. पण राज्य सरकारकडून मात्र या मागणीकडे कानाडोळाच केला जात होता.


मागणी मान्य

अखेर सोमवारी ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाच्या माध्यमातून २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मुलुंड आणि एेरोली टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना (दुचाकी, चारचाकी आणि टेम्पो) टोलमुक्ती देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांना टोलमधून सूट नसेल. राज्य सरकारचा हा निर्णय वाहनधारकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.



हेही वाचा-

लोअर परळचा डिलाइल पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात

बेस्टतर्फे बकरी ईदसाठी जादा बस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा