Advertisement

‘या’ मार्गावर आहे रविवारचा मेगाब्लाॅक

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्स हार्बर उपनगरीय मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवार १४ मार्च २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

‘या’ मार्गावर आहे रविवारचा मेगाब्लाॅक
SHARES

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्स हार्बर उपनगरीय मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवार १४ मार्च २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तर, मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक नसेल. या मार्गावरील वाहतूक सुरळीत असेल

पश्चिम रेल्वे

मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लाॅक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकादरम्यान जलद मार्गावर प्लॅटफाॅर्म नसल्याकारणाने या स्थानकांवर लोकल थांबा नसेल.

मध्य रेल्वे

हार्बरच्या कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेदरम्यान मेगाब्लाॅक असेल. यामुळे सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. वांद्रे/गोरेगाव ते सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला, वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. यावेळी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी असेल.

ट्रान्स हार्बर

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेदरम्यान मेगाब्लाॅक असेल. यावेळेत ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील.


हेही वाचा-

तुमच्याशिवाय ‘हे’ शक्य नाही, महापालिकेची मुंबईकरांना साद

आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय.., सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा