Advertisement

मार्चपासून 'सिंगल तिकीट' प्रणालीवर काम सुरू


मार्चपासून 'सिंगल तिकीट' प्रणालीवर काम सुरू
SHARES

प्रवाशांना लवकरच एकाच तिकीटावर बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. या बाबतच्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' निवासस्थानी आढावा घेतला. या 'सिंगल तिकीट' प्रणालीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची सुरूवात १ मार्चपासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


लवकरच संपूर्ण राज्यातही

प्रवाशांच्या सोयीसाठी ही तिकिट प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रणालीचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं तसंच हे सिंगल तिकीट फक्त मुंबई महानगरापुरतंच मर्यादीत न राहता राज्यातील कुठल्याही शहरा वापरता यावं, यासाठी योग्य प्रक्रिया राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली आहे.



'अशी' असेल एकात्मिक तिकिट प्रणाली

बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकिट प्रणाली असणार आहे. ही तिकिट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे.

या प्रणालीच्या कार्यचलनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार आहे. यानंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

एकाच तिकीटावर करा मेट्रो, मोनो अन् बसचा प्रवास

विमान प्रवासासाठी तिकीटाच्या जागी बायोमेट्रीक्स?

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा