Advertisement

चालत्या ट्रेनमधून उतरणं अंगलट, ट्रेनसोबत गेला फरफटत


चालत्या ट्रेनमधून उतरणं अंगलट, ट्रेनसोबत गेला फरफटत
SHARES

ठाणे रेल्वे स्थानकावर चालत्या एक्स्प्रेसमधून उतरणं एका २५ वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं. ट्रेनमधून उतरताना या तरुणाचा पाय फलाटाच्या पोकळीत गेला आणि तो चक्क ट्रेनसोबत फरफटत जाऊ लागला. सुदैवाने हा प्रकार आरपीएफच्या काॅन्स्टेबलने बघितला. काॅन्स्टेबलने त्वरीत ही एक्स्प्रेस थांबवून तरूणाला बाहेर खेचत त्याचा जीव वाचवला.


कधी घडली घटना?

रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईच्या लोकमान्य टिळक स्थानकावर येऊन थांबणार होती. ही एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर थांबत नाही. एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर धिम्या गतीने धावत असताना उत्तर प्रदेशच्या देवापार, मशादा गावच्या ब्रिजेश कुमार महेश मसहा या २५ वर्षीय तरुणाने सामानासह धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न केला.



'असा' गेला फरफटत

मात्र या प्रयत्नात त्याचा पाय एक्स्प्रेस आणि फलाटामध्ये असलेल्या पोकळीत गेल्याने तो खाली पडला. यामुळे काही अंतरापर्यंत तो एक्स्प्रेससोबत फरफटत गेला. ही बाब स्थानकावर गस्त घालत असलेले आरपीएफ काॅन्स्टेबल अरुण कुमारने पाहिल्यानंतर ते त्याला वाचवण्यासाठी धावले.


जीव वाचला

एक्स्प्रेसमधील प्रवाशांना त्यांनी साखळी खेचण्यास सांगत एक्स्प्रेस थांबवली. एक्स्प्रेसचा वेग कमी झाल्यानंतर अरुणकुमार यांनी ब्रिजेशला फलाटाच्या पोकळीतून बाहेर खेचलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. ब्रिजेशची वेळ आली होती, परंतु काॅन्स्टेबलने त्याच्या मदतीला धावून जात ब्रिजेशचा जीव वाचवला.



हेही वाचा-

चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात

लोकलमधील सराईत आरोपी अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा