Advertisement

लांब पल्ल्याच्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायचा असल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर जावे लागते.

लांब पल्ल्याच्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश
SHARES

मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास अद्याप सर्वांसाठी सुरू झालेला नाही.मात्र, आता रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमधून मर्यादित प्रवास करता येणार आहे. मात्र, रेल्वेने यासाठी  काही अटी घातल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायचा असल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर जावे लागते. मात्र, सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू नसल्याने घरून निघणाऱ्या व बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्या हजारो प्रवाशांचे मोठे हाल होत होते. लोकलचा पर्याय उपलब्ध नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसून प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे १५ डिसेंबर रोजी केली होती. ही मागणी रेल्वेकडून मान्य करण्यात आली आहे.

एखाद्या प्रवाशाकडे लांब पल्ल्याच्या गाडीचं वैध तिकीट असल्यास त्याला संबंधित स्टेशन गाठण्यासाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी असेल. तसंच बाहेरगावाहून आल्यावर कोणत्याही स्टेशनपर्यंत प्रवास करायचा असल्यास लोकलचे तिकीट मिळणार आहे. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा