Advertisement

पाऊस थांबला, आम्हाला ट्रेन कधी मिळणार?


पाऊस थांबला, आम्हाला ट्रेन कधी मिळणार?
SHARES

मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ट्रॅकवर आणि रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरुन मुंबई पूर्वपदावर यायला दोन दिवस जावे लागले. मात्र मुंबई जरी पूर्वपदावर आली असली, तरी रेल्वेचं वेळापत्रक मात्र पूर्वपदावर आलेलं दिसत नाही. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर हेच चित्र दिसत आहे.



मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचं कंबरडंच मोडलं होतं. सुमारे 12 तासांहून अधिक काळ लोकलची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मात्र 48 तास उलटल्यानंतरही मेल एक्स्प्रेसचं वेळापत्रक मात्र अद्याप कोलमडलेलंच आहे. त्यामुळे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर ट्रेनची वाट पहात थांबलेल्या प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

2 ते 3 हजार प्रवासी गेल्या दोन दिवसांपासून इथे थांबले आहेत. शिवाय ट्रेन कधी सुरु होणार याविषयी कोणतीही अनाऊन्समेंट केली जात नाही. रेल्वेकडून कोणतीही सोय केली जात नाही. बकरी इदसाठी निघालो होतो, आता इद ट्रेनमध्येच होते की काय असं वाटतंय.

प्रवासी

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेची वाट पहात थांबलेले आहेत. मात्र पावसामुळे अनेक रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रवाशांची पंचाईत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे प्रवासी इथे थांबले आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अनाऊन्समेंट किंवा माहिती दिली जात असल्यामुळे थांबलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे.



दरम्यान, यातले अनेक प्रवासी हे बकरी इदचा सण साजरा करण्यासाठी निघाले होते. मात्र अजूनही रेल्वे सुरु झाली नसल्यामुळे आता बकरी इद कशी साजरी करायची असा प्रश्न या प्रवाशांना पडला आहे.



दरम्यान, रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने जमलेले प्रवासी आणि त्यांचा वाढत जाणारा संताप पहाता आरपीएफ आणि जीआरपीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेत असल्याचं जीआरपीकडून सांगण्यात आलं आहे.



लोकमान्य टिळक टर्मिनसवर सध्या 2000 हून अधिक प्रवासी जमा झाले आहेत. मात्र ट्रेन नसल्यामुळे रेल्वे थांबलेल्या प्रवाशांना कोणतीही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरवली जात नाही. साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही प्रवाशांना पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच हीच संधी साधून आसपासचे दुकानदार आणि ठेलेवाली अवाच्या सव्वा किंमतीवर प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या वस्तू देत आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या 13 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक ट्रेनच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.



रद्द करण्यात आलेल्या ट्रेन

12542, 11011, 11061, 11053, 13202, 11013, 12219, 22115, 22865, 12167, 11081, 11015, 17318

वेळेत बदल करण्यात आलेल्या ट्रेन

12879, 12107, 11067



हेही वाचा

या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा