Advertisement

रुग्णवाहिकेअभावी प्रवाशाची ६ तास मृत्यूशी झूंज; रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय

पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी दखलही घेतली नाही. तर रूग्णवाहिका नाही असं म्हणत रेल्वे कर्मचारी अक्षरक्ष हातावर हात ठेवून बसले. त्यामुळं तब्बल सहा तास, सकाळी ६ वाजेपर्यंत ही व्यक्ती उपचाराअभावी तडफडत होती. अखेर त्यात त्याचा मृत्यू झाला.

रुग्णवाहिकेअभावी प्रवाशाची ६ तास मृत्यूशी झूंज; रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय
SHARES

रेल्वे प्रशासन किती मुर्दाड आणि असंवेदनशील आहे याचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री दिवा-तळोजा स्थानकादरम्यानच्या ट्रॅकवर आली. कोकणकन्या एक्सप्रेसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रेल्वे प्रशासनानं त्वरीत उपचारासाठी नेणं गरजेचं होतं. मात्र जखमीला तब्बल सहा तास तिथंच तडफडत ठेवण्याची असंवेदनशीलता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली.

रूग्णवाहिका नाही असं तकलादू कारण देत जखमी अवस्थेत ट्रॅकच्या बाजूला तडफडत ठेवलेल्या या व्यक्तीची अखेर सहा तासानंतर उपचाराभावी मृत्यूशी झुंज संपली. धक्कादायक म्हणजे या मृतदेहाला दिवा-ठाणे लोकलमधून फरकट नेत मृत्यूनंतरही या व्यक्तीची हेळसांड करण्यात रेल्वे प्रशासन मागे राहिलं नाही.


पोलिसांकडूनही दखल नाही

सोमवारी मध्यरात्री १ वाजता एका व्यक्तीला कोकणकन्या एक्सप्रेसची धडक लागली. या धडकेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली.  पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी दखलही घेतली नाही. तर रूग्णवाहिका नाही असं म्हणत रेल्वे कर्मचारी अक्षरक्ष हातावर हात ठेवून बसले. त्यामुळं तब्बल सहा तास, सकाळी ६ वाजेपर्यंत ही व्यक्ती उपचाराअभावी तडफडत होती. अखेर त्यात त्याचा मृत्यू झाला.


मृत्यूनंतरही हेळसांड

सकाळी सहानंतर दिव्यातून जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला तात्काळ दिवा स्थानकात थांबवण्यात आलं. मग हमाल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मृतदेह दिवा स्थानकापर्यंत नेण्यासाठी त्यांना रोहा-दिवा पॅसेंजरची वाट पहावी लागली. मग पॅसेंजरमधून मृतदेह साडे आठच्या सुमारास दिवा स्थानकात आणण्यात आला. त्यानंतर दिवा-ठाणे लोकलमधून ठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयात मृतदेह नेण्यात अाला. 



हेही वाचा - 

रेल्वे प्रवाशांनाही ‘झीरो एफआयआर’ करता येणार

भाडेवाढीसाठी २७ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा एल्गार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा