सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस ८ दिवस रद्द

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक दुरुस्ती व इतर कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्या ८ दिवस या मार्गावर धावणार नाहीत.

सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस ८ दिवस रद्द
SHARES

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक दुरुस्ती व इतर कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्या ८ दिवस या मार्गावर धावणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.  

कुठं होणार दुरूस्तीकाम?

गेल्या महिन्यात लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या काही घटना घडल्या. त्यामुळे पुढील ८ दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचं काम करण्यातसाठी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. यादरम्यान मुंबईहून सुटणारी कोयना, सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे. त्यामुळं या ८ दिवसांत प्रवाशांनी मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे: 

  • पुणे-मुंबई सिंहगड, डेक्कन, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द
  • कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी या तिन्ही गाड्या मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार
  • पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द   
  • पुणे-भुसावळ गाडी मनमाडमार्गे धावणार 
  • नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार. पुणे ते पनवेल मार्गावर धावणार नाही हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१६ कोटी दंड वसूलसंबंधित विषय