Advertisement

रेल्वेत ९,७१९ जागांसाठी भरती, महिलांसाठीही 'इतक्या' जागा राखीव

दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मनुष्यबळ कमी होत असते. हेच लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या आणखी ९,७१९ जागांसाठी भरती काढली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठीची जागा सर्वाधिक आहे.

रेल्वेत ९,७१९ जागांसाठी भरती, महिलांसाठीही 'इतक्या' जागा राखीव
SHARES

देशात रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाच्या ९,७१९ जागांसाठी भरती निघाली असून यामध्ये महिलांसाठी ४,५१७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी १ जूनपासून अर्ज दाखल करण्याची मुदत असून अंतिम तारीख ३० जून आहे.


महिलांसाठी इतक्या जागा राखीव

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवशांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ४,५१७ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.


म्हणून रेल्वेने घेतला हा निर्णय

सध्या रेल्वेत १७ विभागीय रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या एकूण ६० हजारांहून अधिक आहे. मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांत प्रवासी संख्या अधिक असून त्या मानाने मनुष्यबळ कमीच आहे. त्याशिवाय दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मनुष्यबळ कमी होत असते. हेच लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या आणखी ९,७१९ जागांसाठी भरती काढली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठीची जागा सर्वाधिक आहे.

  • कॉन्स्टेबलची पदे ८ हजार ६१९
  • ४ हजार ४०३ पुरुष,
  • ४ हजार २१६ जागा महिलांसाठी राखीव
  • उपनिरीक्षक पदाच्याही १,१२० जागा
  • उपनिरीक्षकामध्ये ८१९ पुरुष, ३०१ महिला

हेही वाचा -

सरकारी नोकरी शोधताय?

नोकऱ्यांपुढील 'मेगाब्लाॅक' दूर, रेल्वेनं काढली ८९ हजार जागांची जम्बो भरती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा