Advertisement

रेल्वे स्थानकांवर नवीन एलईडी इंडिकेटर्स

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांवर एलईडी एंडिकेटर्स बसवण्यात येणार आहेत.

रेल्वे स्थानकांवर नवीन एलईडी इंडिकेटर्स
SHARES

आजच्या धावपळीच्या युगात घड्याळाइतकंच रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर्सही महत्त्वाचं बनलं आहे. एलईडीच्या या जमान्या पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवरील इंडिकेटर्सनेही कात टाकणार आहेत. आता पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांवर एलईडी एंडिकेटर्स बसवण्यात येणार आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी रेल्वे स्थानकातील 'इंडिकेटर' महत्वाचं असतं. लोकल कधी येणार हे इंडिकेटरवर समजतं. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या जुन्या आणि खराब इंडिकेटर्समुळे प्रवाशांना लोकलची वेळ समजत नीट नाही. तसंच, काही वेळा प्रवाशी इंडिकेटवर दाखवलेली लोकल पकडतात, पण लोकलमध्ये चढल्यावर ती चुकीची असल्याचं समजतं. अशा परिस्थितीत बरेच प्रवाशी जीव धोक्यात घालून धावत्या लोकलमधून उडी मारतात. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा व लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी, रेल्वे प्रशासनानं जुने इंडिकेटर काढून त्या ठिकाणी नवे एलईडी इंडिकेटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकांवर लवकरच आयपी आधारित इंडिकेटर्स बसविण्यात येणार आहेत.


मार्च अखेरपर्यंत ५० टक्के

पश्चिम रेल्वे मार्गावर ५० टक्के इंडिकेटर्स मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बदलण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात विरार ते बोरिवली स्थानकांवरील सर्व इंडिकेटर्स बदलण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या ३५ स्थानकांवर यापूर्वीच जुने इंडिकेटर्स काढून त्याजागी नवे इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत.


केबलवरील इंडिकेटर्स

कोणत्याही इलेक्ट्रीक वस्तू ५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. मात्र, मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसविण्यात आलेले इंडिकेटर्स खूप जुने झाले असून, काही बिघडलेही आहेत. त्याशिवाय जुने झालेले इंडिकेटर्स केबलच्या सहाय्याने काम करतात; परंतु केबल खराब झाली की इंडिकेटर्स काम करत नाहीत. त्यामुळं प्रवाशांची मात्र धावाधाव होते.


एलईडी इंडिकेटर्स

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील पादचारी पुलावर मागील वर्षी एलईडी इंडिकेटर बसविण्यात आला आहे. या इंडिकेटरला ५ महीने झाले असून, अद्याप तो सुरळीतपणे सुरू आहे.



हेही वाचा -

खुशखबर! शिवशाही 'शयनयान'च्या तिकीट दरात कपात

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, समाजशास्त्रात नाहीत नववीचे प्रश्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा