सायन उड्डाणपुलाची दुरुस्ती १५ दिवसांत सुरु

दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले जॅक एमएसआरडीसीकडे आल्यावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यावर सर्वच वाहनांना उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

SHARE

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १५ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ४५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावं लागणार आहे. वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार या मार्गावर वाहतुकीमध्ये बदल करून ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले जॅक एमएसआरडीसीकडे आल्यावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यावर सर्वच वाहनांना उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सायन उड्डाणपुलाचे १७० बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम जॅकच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना डिसेंबर २०१८ पासून बंदी घालण्यात आली आहे. 

वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचा अभ्यास करून वाहतूक वळविण्याबाबत आणि ब्लॉक घेण्याबाबत एमएसआरडीसीला कळविण्यात येणार आहे. ८ मार्च २०१९ ला या पुलाच्या स्लॅबचा प्लास्टरचा तुकडा कोसळल्यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र, हे काम लांबलं होतं. नवी मुंबई  आणि पूर्व उपनगरातून शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या हजारो वाहनांना या पुलाचा वापर करावा लागतो. या पुलाच्या दुरुस्तीच्या काळामध्ये सायन सर्कलमध्ये वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्त

बापाने केली मुलीची हत्या, 'हे' आहे कारण
संबंधित विषय
ताज्या बातम्या