Advertisement

जखमी रेल्वे प्रवाशांचा वाली कोण?

दररोज रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना अपघात होऊन ते जखमी अवस्थेत आहे त्याच ठिकाणी पडून राहतात. तरीही त्यांना उचलायला कुणीही पुढं येत नाही. यामागचं कारण आहे रेल्वेने अशा जखमी प्रवाशांना उचलण्यासाठी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. ही माहिती रेल्वे प्रशासनानेच दिली अाहे.

जखमी रेल्वे प्रवाशांचा वाली कोण?
SHARES

रेल्वेला मुंबईतून सर्वाधिक महसूल मिळत असूनही रेल्वे प्रशासन मुंबईकर प्रवाशांसोबत सावत्रपणाचा व्यवहार करत असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. गेल्या वर्षी एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरी हे याचं उत्तम उदाहरण. या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दररोज प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना अपघात होऊन ते जखमी अवस्थेत आहे त्याच ठिकाणी पडून राहतात. तरीही त्यांना उचलायला कुणीही पुढं येत नाही. यामागचं कारण आहे रेल्वेने अशा जखमी प्रवाशांना उचलण्यासाठी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. ही माहिती रेल्वे प्रशासनानेच दिली अाहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई उपनगरीय लोकलगाडीतून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी रेल्वे स्थानकांवर किती कर्मचारी व हमाल नियुक्त केले आहेत. त्याची माहिती मागितली होती.


रेल्वेची अधिकृत माहिती

या संदर्भात मध्ये रेल्वेचे माहिती अधिकारी नर्मेश्वर झा यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यातून पडून जखमी किंवा मृत प्रवाशांना उचलण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केलेले नाहीत. रेल्वे अपघातानंतर जखमी किंवा मृत प्रवाशांना उचलण्यासाठी संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवकांची मदत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.


वेळेत उपचार नाही

मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफलाइन. दररोज १ कोटीपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय लोकलमधून प्रवास करतात. खचाखच गर्दीने भरलेल्या या लोकलमधून स्वत: चा जीव धोक्यात घालून प्रवासी दररोज प्रवास करतात. कधी लोकलच्या दरवाजात उभं राहताना तोल जाऊन, खांबाला धडकून, रेल्वे रुळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रोज १० ते १२ प्रवाशांचा मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे वेळेत उपचार न मिळाल्याने होतात.


गर्दुल्ल्यांची मदत

'अपघात झाल्यावर रेल्वे स्थानक मास्टर जखमी किंवा मृत प्रवाशांना उचलण्यासाठी व्यसनी किंवा गर्दुल्ल्यांची मदत घेतात. त्यांना शोधून काढण्यासाठीही बराच वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो.', असं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितलं.


नियुक्तीची मागणी

रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र पाठवून सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जखमी आणि मृत प्रवाशांना उचलण्यासाठी विशेष कर्मचारी किंवा हमालांची नियुक्ती करण्याची मागणी देखील शेख यांनी केली आहे.


२०१७ मधील जखमी, मृत प्रवाशांची आकडेवारी

रेल्वे मार्ग
जखमी प्रवासी
मृत प्रवासी
मध्य रेल्वे
१४३५
१५३४
पश्चिम रेल्वे
१५४०
१०८६
हार्बर रेल्वे
३७०
३९४
एकूण
३३४५
३०१४

 
 



हेही वाचा-

रेल्वेत ९,७१९ जागांसाठी भरती, महिलांसाठीही 'इतक्या' जागा राखीव

मुंबईतली 'ही' ३ रेल्वे स्थानकं सर्वात अस्वच्छ!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा