मध्य रेल्वे मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक असणार आहे. कल्याणचा १०० वर्षे जुना पत्री पूल पाडण्याकरीता हा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच या ब्लॉकमुळे १७० फेऱ्या रद्द करण्यात येणार असून ४० मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी रविवारचा रेल्वे प्रवास मनस्तापाचा ठरणार आहे.
कल्याणचा पत्री पूल असुरक्षित घोषित केल्यापासून या पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणं पत्री पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्यात आला असून या पूलावरून प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसंच, ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते डोंबिवली, कर्जत-कसारा ते कल्याणपर्यंत सेवा सुरु राहणार आहेत.
दरम्यान रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कल्याण स्थानकात येणारी-जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते पुणेदरम्यानच्या मेल व एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
हेही वाचा-
ओला-उबर टॅक्सीचालक शनिवारपासून पुन्हा संपावर
रेल्वेमार्गावर एका दिवसात 12 अपघाती मृत्यू