Advertisement

३१ डिसेंबरला रात्री परळ स्थानकात पॉवर ब्लॉक


३१ डिसेंबरला रात्री परळ स्थानकात पॉवर ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून १ तारखेला पहाटे ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.


ब्लाॅक कुठे?

परळ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर हा ब्लॉक असणार आहे. मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



काय बदल?

या ब्लॉक दरम्यान माटुंगा स्थानकातून सीएसटीएमसाठी रात्री ११.५७ वाजल्यापासून ते पहाटे ५ .०२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या (९ लोकल गाड्या) मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान परळ स्थानकात या गाड्यांना दोनदा थांबा देण्यात येणार आहे.


लोकल थांबणार नाहीत

करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकात जलद लोकल थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. या स्थानकातील प्रवासी परळ आणि भायखळा स्थानकातून प्रवास करु शकतात, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा-

थर्टी फर्स्टला मुंबई-मांडवा फेरीबोट सेवा बंद

थर्टी फर्स्टसाठी बेस्टच्या जादा बस गाड्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा