Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन!


गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन!
SHARES

गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. कोकणात जाणाऱ्या सगळ्या ट्रेन हाउसफुल्ल झाल्या असतील त्यामुळे कोकणात जाणार कसे? असा प्रश्न चाकरमान्यांसमोर उपस्थित झाला असेल. पण काळजी नको. कारण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, म्हणून मध्य रेल्वेने आणखी 8 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी गणेशोत्सवासाठी 242 फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. सद्यस्थितीतील बहुतांश ट्रेनचे बुकिंग फुल झाल्यामुळे मुंबई-चिपळूण, पुणे-सावंतवाडी मार्गावर या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.


मुंबई-चिपळूण-मुंबई मार्गावर धावणाऱ्या ट्रेन 

ट्रेन क्रमांक (01101) मुंबई-चिपळूण-मुंबई या मार्गावर चार फेऱ्या चालवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट ते 25 आॅगस्ट या कालावधीत या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 20 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12.45 वाजता चिपळूणला जाण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली होती. या ट्रेनचा परतीचा प्रवास (01102) चिपळूण येथून 21 आॅगस्टला संध्याकाळी 5.45 वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी रात्री 11.40 मिनिटांनी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे.


पुणे-सावंतवाडी मार्गावर धावणाऱ्या ट्रेन 

ट्रेन क्रमांक (01461) पुणे-सावंतवाडी ही ट्रेन पुणे येथून 22 आॅगस्ट रोजी संध्याकाळी 6.45 वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहचणार आहे. लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, झरप या स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. ट्रेन क्रमांक (01462) सावंतवाडी रोड येथून 23 ऑगस्टला दुपारी 2.5 मिनिटांनी सुटणार असून पुणे स्थानकावर मध्यरात्री 3.55 वाजता पोहचणार आहे.


मनमाड-करमळी वन वे विशेष ट्रेन

ट्रेन क्रमांक (01271) मनमाड-करमळी वन वे विशेष ही ट्रेन मनमाड येथून 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4.15 वाजता सुटणार असून करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.


करमळी-अजनी वन वे विशेष ट्रेन

ट्रेन क्रमांक (01272) करमळी-अजनी वन वे विशेष ही ट्रेन करमळी येथून 23 ऑगस्टला दुपारी 1 वाजता सुटणार असून अजनी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.15 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे.हेही वाचा - 

मध्य रेल्वेवरून धावणार 24 नवीन लोकल

गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या


संबंधित विषय
Advertisement