Advertisement

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार?


एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार?
SHARES

वेतनवाढीच्या मुद्द्यावर संतप्त असलेले महाराष्ट्र परिवहन मंडळाचे कर्मचारी गेल्या वर्षी एेन दिवाळीत संपावर गेले होते. 'सातवा वेतन आयोग लागू करा' अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचारी संघटनांनी केली होती. पण 'अजूनही यावर सरकारची भूमिका सकारात्मक दिसत नाही', असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.


सरकारने तोंडाला पाने पुसली...

"एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्य कार्यकारणीने दिलेला वेतन वाढीचा प्रस्ताव देखील फेटाळला आहे. 1100 कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी तो कमी करत 741 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर येत्या 19 तारखेला होणारी बैठक आणि 29 तारखेला होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीनंतर पुढील निर्णय घेऊ," असे संदीप शिंदे यांनी 'मुंबई लाईव्ह'सोबत बोलताना सांगितले.


पगारवाढ की कर्मचाऱ्यांची चेष्टा?

मागील वर्षी करण्यात आलेला संप उच्च न्यायालयाचा मान राखत मागे घेतला गेला. सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीसोबतच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्यावे, अशी देखील मागणी करण्यात आली होती. पण वाहकांसाठी 815 रूपये, चालकांसाठी 874 तर स्वेच्छाक 680 रूपये अशी चेष्टा केल्याप्रमाणे पगारवाढ करण्यात आल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे कर्मचारी पुन्हा संपावर जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांनाही अाता मिळणार मुंबईत घर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा