Advertisement

तेजस एक्स्प्रेसला चिपळूण स्थानकातही थांबा

येत्या २० मार्चपासून या गाडीला चिपळूण स्थानकातही थांबा देण्यात येणार आहे. चिपळूण हे कोकणातील सर्वाधिक गर्दीचं आणि महत्त्वाचं स्थानक असूनही इथं तेजसला थांबा नसल्याने प्रवासी काहीसे नाराज होते. त्यामुळे प्रवाशांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तेजस एक्स्प्रेसला चिपळूण स्थानकातही थांबा
SHARES

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी अशी सुपरफास्ट धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण स्थानकातही थांबा देण्यात येणार आहे.


आतापर्यंत मोजकेच थांबे

आतापर्यंत कोकण रेल्वेहून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला सीएसएमटी, दादर, ठाणे, पनेवल, रत्नागिरी आणि कुडाळ असे मोजकेच थांबे देण्यात आले होते. पण, येत्या २० मार्चपासून या गाडीला चिपळूण स्थानकातही थांबा देण्यात येणार आहे. चिपळूण हे कोकणातील सर्वाधिक गर्दीचं आणि महत्त्वाचं स्थानक असूनही इथं तेजसला थांबा नसल्याने प्रवासी काहीसे नाराज होते. त्यामुळे प्रवाशांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.



२० मार्चपासून देणार थांबा

चिपळूण स्थानकावर तेजस एक्स्प्रेसला येत्या २० मार्चपासून थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे, या गाडीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. २० मार्चपासून सीएसएमटी-करमाळी (२२११९/२२१२०) अशी आठवड्यातून ५ दिवस धावणारी तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी ९ वाजून ०४ मिनिटांनी सुटणार असून चिपळूणला सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी पोहोचणार आहे.

या थांब्यामुळे प्रवासी संख्येत देखील वाढ होण्यासाठी मदत होईल, असं मत कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर यांनी व्यक्त केलं आहे.



हेही वाचा-

'तेजस'ला मिळणार दमदार इंजिन, वेग ताशी 200 किमी!

'तेजस'मध्ये घ्या आता विकतचेच हेडफोन!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा