याला म्हणतात स्वाभिमान...!

मुंबई - केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अंध व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी मुंबई पालिकेकडून बेस्टला एक कोटींचे अनुदानही मिळणार आहे. पण या सवलतीला अंध व्यक्तींनी विरोध केलाय.

बेस्टच्या मोफत प्रवासाची सवलत देण्यामागे सरकारचा हेतू जरी चांगला असला, तरी अंध समाजानं मात्र करारी बाणा दाखवत याला विरोध केलाय. जे काही मिळेल ते स्वत:च्या हिंमतीवर मिळवू या त्यांच्या कणखर भूमिकेला मुंबई लाइव्हचा सलाम.

Loading Comments