आता बस स्टॉपलाही रेनकोट!

  Worli
  आता बस स्टॉपलाही रेनकोट!
  मुंबई  -  

  पावसाळा म्हटलं की हौसेनं म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा, रेनकोट घालावाच लागतो. बसस्टॉपवर उभं राहिलं की पावसाच्या पाण्याच भिजल्याचा अनुभव आपण हमखास घेतो. मुंबईत असा एक बसस्टॉप आहे, जिथे कितीही पाऊस पडला तरी तुम्ही भिजणार नाहीत! चक्रावलात ना?

  तुम्ही जर मुंबईतल्या वरळी सी फेस बसस्टॉपवर उभे राहिलात, तर तुम्ही अजिबात भिजणार नाहीत. कारण या संपूर्ण बसस्टॉपलाच रेनकोट घालण्यात आला आहे. एका खाजगी कंपनीच्या जाहिरातीसाठी हा रेनकोट घालण्यात आला आहे.

  मागील वर्षी अशाच प्रकारे दिल्लीमध्ये एका बसस्टॉपवर जाहिरात करण्यात आली होती.

  दरम्यान, बसस्टॉपला जाहिरातीसाठी जरी प्लॅस्टिक लावण्यात आलं असलं, तरी त्यामुळे मुंबईकरांची मात्र पावसात भिजण्याची समस्या सुटली आहे. या रेनकोटवाल्या बसस्टॉपमुळे पावसात बसची वाट पहाणं सोपं झाल्याची प्रतिक्रिया राहुल सिंग या प्रवाशाने दिली आहे.  हेही वाचा

  बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.