Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरचं ट्रॉमा केअर सेंटर होणार सुरू, दीड वर्षांची धूळ उडणार!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 'मृत्यूचा एक्सप्रेस वे' होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्सप्रेस वेवर ट्रॉमा केअर सेंटर बांधलं. पण गेल्या दीड वर्षांपासून हे ट्रॉमा केअर सेंटर धूळ खात पडून आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरचं ट्रॉमा केअर सेंटर होणार सुरू, दीड वर्षांची धूळ उडणार!
SHARES

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमुळे मुंबई-पुणे अंतर कमी झालं असून प्रवास फास्ट झाला आहे. पण त्याचवेळी एक्सप्रेस वेवर अपघाताच्याही घटना लक्षणीय आहेत. तर दरड कोसळण्याच्या घटनाही एक्सप्रेस वेवर सातत्याने होतात. अशा वेळी अपघातग्रस्तांना तातडीने मदत आणि वैदयकीय उपचार मिळण्याची गरज असते. पण ही मदत आणि वैदयकीय उपचार वेळेत मिळत नसल्यानं अनेकांना प्राण गमवावे लागतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अशाप्रकारे 'मृत्यूचा एक्सप्रेस वे' होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्सप्रेस वेवर ट्रॉमा केअर सेंटर बांधलं. पण गेल्या दीड वर्षांपासून हे ट्रॉमा केअर सेंटर धूळ खात पडून आहे.


MSRDCने मागवल्या निविदा

तब्बल दीड वर्षांनंतरएमएसआरडीसीने ट्रॉमा केअर चालवण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट-रूग्णालयांकडून नुकत्याच निविदा मागवल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे आता धूळ खात पडून असलेलं हे ट्रॉमा केअर सेंटर लवकरच सुरू होणार असून एक्सप्रेस वे वरील अपघातग्रस्तांसह इतर रूग्णांनाही त्वरीत वैदयकीय उपचार मिळणार आहेत.


सिद्धिविनायक ट्रस्टची मदत

एक्सप्रेस वेवरील तळेगाव येथील आॅझार्ड येथे हे ट्रॉमा केअर सेंटर एमएसआरडीसीनं बांधलं आहे. ट्रॉमा केअर सेंटरच्या बांधकामाचा सर्व खर्च एमएसआरडीएनं उचलला आहे. इथे वैदयकीय उपकरणं पुरवण्यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टची मदत घेण्यात आली आहे. त्यासाठी ट्रस्टनं सव्वा कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.



सेंटर सुरु होण्यासाठी अजून ३-४ महिने

वैदयकीय उपकरणांचा प्रश्न मार्गी लागल्यानं आता प्रत्यक्षात हे सेंटर चालवण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट-रूग्णालयांकडून निविदा मागवल्या आहेत. या निविदा अंतिम झाल्यानंतर सेंटर चालवण्यासाठीचं कंत्राट देत सेंटर सेवेत दाखल करण्यात येणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांत हे सेंटर सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. चॅरिटेबल ट्रस्टकडून हे ट्रॉमा केअर सेंटर चालवले जाणार असून पुढे या ट्रॉमा केअर सेंटरची सर्व जबाबदारी आरोग्य विभाग आणि नॅशनल हायवे अॅथॉरिटीची असणार आहे.


सहा वर्षांत १३२३ जणांचा बळी

९४ किमी अंतराच्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या सहा वर्षांत, २०१० ते २०१६ दरम्यान ४६३४ अपघात झाले. या अपघातात १ हजार ३२३ जणांचा बळी गेला आहे. अपघातांना आळा घालत एक्सप्रेस वेला शून्य अपघात करण्यासाठी एमएसआरडीसीकडून प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.



हेही वाचा

४० हजार रुग्ण, २ कोटींची बचत - वन रुपी क्लिनिकची कामगिरी!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा