Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर दोन दिवसांनी मागे


एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर दोन दिवसांनी मागे
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर दोन दिवसांनी मिटला अाहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शनिवारी विविध एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घेत असल्याची घोषणा केली.


एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक सुरू केलेला संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगावे, असे अावाहन दिवाकर रावते यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देअोल यांच्यासह मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


वेतनवाढीबाबत गैरसमज

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी ४८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. यात कर्मचाऱ्यांचं वेतन चांगलं वाढणार आहे. पण कर्मचाऱ्यांमध्ये या वेतनवाढीसंदर्भात उलटसुलट गैरसमज निर्माण झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी सर्वात अाधी आपली वेतनवाढ नेमकी किती झाली, हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यात आली असून त्यांनी अचानक पुकारलेला बेकायदेशीर संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावे, असं आवाहन रावते यांनी केलं.


कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?

संप सुरू असताना अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात अाली होती. अाता ही करावाई मागे घेण्यात येईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही दिवाकर रावते यांनी सांगितले.


हेही वाचा -

दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा ठप्प, वेतनवाढ होणार रद्द

Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा