Advertisement

उल्हासनगर, विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लोकलमधून पडून दोघे जखमी

विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनपासूनजवळ मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडली. यामध्ये तरूणी गंभीर जखमी झाली.

उल्हासनगर, विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लोकलमधून पडून दोघे जखमी
SHARES

कोपर स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी दोघे जण लोकलमधून पडून  गंभीर जखमी झाले आहेत. उल्हासनगर व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक तरूण आणि तरूण लोकलमधून पडले. तरुणीला कल्याण तर तरुणाला मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. 

विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनपासूनजवळ  मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडली. यामध्ये तरूणी गंभीर जखमी झाली. मात्र, तिला उचलून नेण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमध्ये कोणीही उपलब्ध नव्हते. अखेर दिनेश धुमाळ व विशाल रोखडे या तरुणाने मुलीला उचलून रिक्षातून कल्याण येथील रुग्णालयात हलविले. विठ्ठलवाडी स्टेशनला रुग्णवाहिका, व्हीलचेअर, रेल्वे अधिकारी आणि पोलिस उपस्थित नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. 

दुसऱ्या घटनेत उल्हासनगर स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून गायकवाड नावाचा मुलगा पडून गंभीर जखमी झाला. बुधवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. वन रुपीज क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आलं. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 



हेही वाचा  -

हिमालय पूल दुर्घटनेतील आरोपी तुरूंगाबाहेर, आॅडिटरचाही समावेश

बापरे! मुंबईत रिक्षांची संख्या 'इतकी' वाढली




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा