Advertisement

मुंबई आणि इतर शहरांमध्ये उबर लवकरच आणेल १००० इलेक्ट्रिक सेडन्स

२०४० पर्यंत उबरनं १००% उत्सर्जन-मुक्त राइड्स प्रदान करण्याचं जागतिक लक्ष्य ठेवलं आहे

मुंबई आणि इतर शहरांमध्ये उबर लवकरच आणेल १००० इलेक्ट्रिक सेडन्स
SHARES

उबरनं इलेक्ट्रिक फ्लीट सर्व्हिस लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीजबरोबर नवीन भागीदारीची घोषणा केली. या भागिदारीच्या मदतीनं मुंबई, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये उबर प्रवाशांसाठी 1000 हून अधिक इलेक्ट्रिक सेडान आणणार आहे.

२०४० पर्यंत उबरनं १००% उत्सर्जन-मुक्त राइड्स प्रदान करण्याचं जागतिक लक्ष्य ठेवलं आहे. तर प्रतिस्पर्धी कॅब सर्व्हिस लिफ्टकडे २०३० पर्यंतचे समान लक्ष्य आहे.

सध्या उबरकडे देशभरात १०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहनं धावत आहेत. ज्यात टाटा टिगोर ईव्ही आणि महिंद्रा इव्हेरिटो सारख्या वाहनांचा समावेश आहे. लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीजसाठी, कंपनीकडे उपरोक्त शहरांमध्ये वेगवान आणि मानक चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क आहे जे रोलआउट सुलभ करते.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, वेगवान चार्जर ९० मिनिटांत सेडान पूर्णपणे रिचार्ज करु शकतो, तर प्रमाणित चार्जरला ९ तास लागू शकतात.

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंह म्हणाले की, कंपनी येत्या १२ महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २००० वर नेईल. उबरनं यापूर्वी असं म्हटलं आहे की, ते त्यांच्या ड्रायव्हर-भागीदारांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्थलांतरित करण्यात मदत करण्यासाठी ८०० दशलक्ष डॉलर्स ( ५ हजार ८९३ कोटी) खर्च करेल.

अमेरिकन कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, टेस्लाचा २०२१ पर्यंत भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश निश्चित आहे. २०१८ मध्ये कंपनीच्या आंशिक उपस्थितीबद्दल बोललं गेलं असलं तरी सरकारी नियमांचा हवाला देऊन त्यांनी आपल्या गाड्या भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या नाहीत.



हेही वाचा

सर्वसामान्यांना लोकल प्रवास? आधी मास्क घालण्याची शिस्त लागू द्या...

लोकलमधून आता दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना प्रवासाची मुभा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा