Advertisement

मास्कवाला सेल्फी पाठवल्यानंतरच कॅब येणार दारात

जवळपास १ हजार २५० प्रवाशांना उबेरकडून टॅग करण्यात आलं आहे. गेले काही आठवडे मास्क न घालता प्रवास करणाऱ्यांना उबेरकडून टॅगही करण्यात आलं आहे.

मास्कवाला सेल्फी पाठवल्यानंतरच कॅब येणार दारात
SHARES

उबेर Uber इंडियानं, रायडर मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी (rider mask verification selfie) फीचर सुरू केलं आहे. ज्यांनी गेल्या काही दिवसांत उबेर कॅबमध्ये विना मास्क प्रवास केला आहे, त्या प्रवाशांसाठी हे फीचर सुरू करण्यात आलं आहे.

जवळपास १ हजार २५० प्रवाशांना उबेरकडून टॅग करण्यात आलं आहे.  गेले काही आठवडे मास्क न घालता प्रवास करणाऱ्यांना उबेरकडून टॅगही करण्यात आलं आहे.

उबेर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना टॅग केलं आहे अशा प्रवाशांना आपली पुढील राईड बुक करण्यावेळी मास्क घालून सेल्फी काढावा लागेल आणि तो उबेरकडे पाठवावा लागेल. उबेरनं हे फीचर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केलं होतं. त्यांना मिळालेल्या यशानंतर आता हे फीचर उबेरनं भारतातही सुरू केलं आहे.

उबेर इंडियाचे अधिकारी पवन वैश्य म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रवासी विना मास्क उबेरमधून प्रवास करताना आढळले. अशाप्रकारे प्रवास करणं प्रवासी आणि कॅब ड्रायव्हर दोघांसाठीही नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे आधी विना मास्क प्रवास केलेल्या अनेक प्रवाशांना टॅग करण्यात आलं आहे.

कोरोना काळात प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी उबेरनं ड्रायव्हर्ससाठी मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. ड्रायव्हरला प्रवासापूर्वी मास्क घालून काढलेला स्वत:चा सेल्फी उबेर इंडियाकडे पाठवावा लागत होता. त्यानंतरच ड्रायव्हर्सला बुकिंग दिली जात होती. संपूर्ण भारतातून ड्रायव्हर्सचे १७.४४ मिलियनहून अधिक सेल्फी आले आहे.हेही वाचा

प्रवाशांच्या चेक-इनसाठी क्युआरकोड स्कॅनर मशिन गेट

मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement