Advertisement

वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानच नवा पादचारी पूल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा रेल्वे प्रवास थांबला असला तरी, अद्याप रेल्वे प्रशासन आपल्या बांधकामांपासून थांबलेलं नाही.

वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानच नवा पादचारी पूल
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर प्रवाशांचा रेल्वे प्रवास थांबला असला तरी, अद्याप रेल्वे प्रशासन आपल्या बांधकामांपासून थांबलेलं नाही. रेल्वे प्रवाशाला त्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे (bandra) आणि खार रोड (khar road) स्थानकादरम्यान नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेच्या (western railway) याच मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करत असत. आता त्याला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म ६/ ७ वर असलेला सध्याचा पादचारी पूल एलसी गेट १९ जवळचा पश्चिम भाग या पुलाला जोडला गेला आहे. २४७ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद असा हा नवा पूल आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि सर्व कामे नियोजित वेळेच्या आधी पूर्ण केली जावीत, असा पश्चिम रेल्वेने निर्धार केला आहे.हेही वाचा -

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा