Advertisement

ठाणे-मुंब्रा बायपासचं काम सुरू, रस्ता दोन महिन्यांसाठी बंद


ठाणे-मुंब्रा बायपासचं काम सुरू, रस्ता दोन महिन्यांसाठी बंद
SHARES

ठाणे-मुंब्रा बायपास रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी १६ एप्रिलपासून बंद होणार असं म्हटलं जात होतं. पण दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला. अखेर ८ मे रोजी दुपारी ठाणे-मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामासाठी आता हा रस्ता तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्यांना पुढचे दोन महिने वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.


दररोज ४० हजार वाहनांची वर्दळ

मुंबई-ठाणे-कल्याणला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून दररोज 40 हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. दहा वर्षांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात अाली होती, तेव्हा चार महिने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. पण अवघ्या काही वर्षातच रस्त्याची दूरवस्था झाली अाहे. अखेर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम घेण्यात अालं अाहे.


दोन महिने रस्ता बंद

रस्ता नादुरूस्त झाल्यानं पुन्हा रस्त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून या कामासाठी तब्बल दोन महिन्यांसाठी बंद ठेवावा लागणार आहे. १६ एप्रिलपासून कामाला सुरूवात करण्याचं संबंधित यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलं होतं. पण हे काम रखडलं आणि अखेर मंगळवारी ८ मे रोजी कामाला सुरूवात झाली आहे.


एेरोली, शिळफाट्यावर वाहतूककोंडी

आता बॅरिगेट्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच एेरोली, शिळफाटा या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. येथील वाहतूक एेरोली, शिळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. तर उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणारी-येणारी वाहतूक दुपारी आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येणार आहे. तसेच घोडबंदर मार्गावर दुपारी १२ ते ४ या वेळेतही नियंत्रित पद्धतीनं अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

ठाणे-मुंब्रा बायपास २ महिन्यांसाठी बंद!

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा