व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृती

  BMC
  व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृती
  मुंबई  -  

  फोर्ट : श्री अष्टविनायक मित्र मंडळाने एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश दिला आहे. मंडळाच्या स्थापनेचे यंदाचे हे 38 वे वर्ष आहे. बांबू आणि गवताचा वापर करून यंदा 19 फुट उंचीच्या बाप्पाची मूर्ती साकारण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवीराज शेट्टी यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे  भविष्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोखा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश या मंडळाने दिला आहे.    

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.