1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !

 Malad West
1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !
1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !
1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !
1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !
1200 भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस !
See all
Malad West, Mumbai  -  

आजवर अनेक सेलिब्रिटिंच्या वाढदिवसाच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. अनेक राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील. तुमच्या नातेवाईकांच्या वाढदिवसालाही तुम्ही गेले असाल. पण मालाडमध्ये आज एक आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस ना कुठल्या नेत्याचा होता ना सेलिब्रिटिचा..हा वाढदिवस होता तब्बल 1200 भटक्या कुत्र्यांचा. मालाडच्या  ‘अ‍ॅनिमल्स मॅटर टू मी’ या  संस्थेने पहिल्यांदाच तब्बल १२००  भटक्या  कुत्र्यांचा  वाढदिवस  साजरा  केलाय. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी संस्थेच्या 263 स्वयंसेवकांसोबतच मुंबईच्या कानाकोप-यातून अनेक श्वानप्रेमी दाखल झाले होते. या श्वानांसाठी मटण आणि भाताचा स्पेशल बेतही आखण्यात आला होता. मालाडमधल्या एरंगल, अक्सा, मढ, मार्वे दानापाणी आणि  मढ जेटटी या परिसरातल्या भटक्या कुत्र्यांचा यात समावेश होता. या कुत्र्यांवर विशिष्ट पद्धीच्या खुणा, लसीकरण आणि नसबंदी आदी गोष्टीही यावेळी करण्यात आल्या.  महानगर गॅस व टाटा ग्रुपच्या सहकार्याने हा उपक्रम पार पाडण्यात आला.

 

Loading Comments