Advertisement

आकाश अंबानीची निमंत्रणपत्रिका पाहिलीत का?

प्री एन्गेजमेंट सेरिमनीनंतर सर्वांचं लक्ष लागलं आहे ते आकाशच्या लग्नाकडे. आकाशचा ३० जून रोजी साखरपुडा होणार असून नीता अंबानी आणि आकाश अंबानी या दोघांनी सोमवारी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन तिथं निमंत्रण पत्रिका वाहिली. या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आकाश अंबानीची निमंत्रणपत्रिका पाहिलीत का?
SHARES

जगात सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपतींच्या यादीमध्ये 'मुकेश अंबानी' हे नाव अग्रस्थानी आहे. देशात तर रिलायन्स ग्रुप सर्वच क्षेत्रात पुढे आहे. अंबानी म्हटलं की 'श्रीमंती थाट' आलाच! त्यातही मुकेश अंबानी यांच्या सुपूत्राचं लग्न म्हटलं तर 'होऊ दे खर्च' हे शब्द देखील फिके पडतील. त्यामुळेच प्री एन्गेजमेंट सेरिमनीनंतर सर्वांचं लक्ष लागलं आहे ते आकाशच्या लग्नाकडे. आकाशचा ३० जून रोजी साखरपुडा होणार असून नीता अंबानी आणि आकाश अंबानी या दोघांनी सोमवारी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन तिथं निमंत्रण पत्रिका वाहिली. या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


शाही निमंत्रणपत्रिका

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी गणपतीचं दर्शन घेत त्यांना निमंत्रणपत्रिका अर्पण केली. या निमंत्रणपत्रिकेचा थाट अत्यंत शाही पद्धतीचा आहे. निमंत्रणपत्रिकेतील काचेच्या तबकड्यात गणपतींची सुरेख मूर्ती आहे. त्यासोबत आकाश आणि श्लोका यांच्या एन्गेजमेंटची निमंत्रणपत्रिका आहे.


किंमत थक्क करणारी

मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या निमंत्रणपत्रिकेच्या व्हिडिओवरून सर्वांनीच शाही सोहळ्याचा अंदाज बांधून घेतला आहे. ही निमंत्रणपत्रिका केवळ ५० पाहुण्यांनाच देण्यात येणार आहे. पाहुण्यांमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीचा समावेश आहे. या निमंत्रणपत्रिकेची किंमत प्रत्येकी दीड लाख असल्याचा अंदाज आहे.


महिन्याअखेर होणार साखरपुडा

आकाश अंबानी यांनी २४ मार्च २०१८ रोजी गोव्यात आपली बालमैत्रिण श्लोका मेहता हिच्यासोबत प्री-एन्गेजमेंट सेरिमनी झाली होती. यावेळी दिग्गज लोक सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात हा समारंभ पार पडला होता. आता ३० जून २०१८ रोजी दोघांच्या साखपरपुड्याचा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती आहे.हेही वाचा-

अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या 'पुड्या'!

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा