Advertisement

गुरूकुल स्कूल ऑफ आर्टचं पंतप्रधानांनी केलं कौतुक


गुरूकुल स्कूल ऑफ आर्टचं पंतप्रधानांनी केलं कौतुक
SHARES

मुंबईसह देशभरात घडत असलेल्या घटनांवर आधारित चित्र गिरणगावातल्या गुरूकुल स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी नेहमीच रेखाटतात. अनेकदा बेस्ट वाचवा, पाणी वाचवा, गणेशोत्सव, मातृदिन, नवरात्रोत्सव, मुंबई महापालिका, शिक्षणाचे महत्त्व अशा बाबींवर चित्रातून जनजागृती केली जाते. याचबरोबर विशेष तसेच अपघाती निधन झालेल्या व्यक्तींना चित्र आणि रांगोळीच्या माध्यमातून गुरुकुलकडून श्रद्धांजली वाहण्यात येते. बऱ्याचदा समाजातील विशेष व्यक्तींच्या वाढदिवसाला देखील चित्रातून आणि रांगोळीतून शुभेच्छा दिल्या जातात. 

आपल्या विद्यार्थ्यांना समाजात घडणाऱ्या गोष्टींची संपूर्ण माहिती असावी, यासाठी गुरूकुलचे प्राध्यापक सागर कांबळी सर्व प्रकारचे विषय चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून हाताळून घेतात.

गुरूकुलच्या विद्यार्थ्यांची कला फक्त मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर सातासमुद्रापार पोहचली आहे. गुरूकुलच्या विद्यार्थ्यांची सर्व स्तरावर या पूर्वी दखल घेण्यात आली आहे.पंतप्रधानांनी पत्र पाठवून मानले आभार

गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रांगोळीतून शुभेच्छा दिल्या होत्या. याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. त्यामुळे पंतप्रधान यांनी पत्र पाठवून गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून समाजात जनजागृती तसेच समाजोपयोगी काम केल्याबद्दल गुरूकुलला 10 वेळा पत्र पाठवून अभिनंदन करण्यात आले आहे. यापैकी 4 पत्रे नरेंद्र मोदींनी पाठवलेली आहेत, अशी माहिती गुरूकुलचे प्राध्यापक सागर कांबळी यांनी दिली.


हेही वाचा - 

रेल्वे अपघातातील मृतांना बालचित्रकारांची श्रद्धांजली


संबंधित विषय
Advertisement