Advertisement

सलमानला देशाबाहेर जायलाही परवानगी; न्यायालयाने दिली मुभा


सलमानला देशाबाहेर जायलाही परवानगी; न्यायालयाने दिली मुभा
SHARES

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी मानत ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, ४८ तासांच्या आत त्याला जामीन मिळाला. आणि आता तर सलमानला परदेशवारीचीही मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नक्की सलमानला शिक्षा झाली आहे का? असाच प्रश्न निर्माण होत आहे.


सलामान दीड महिना जाणार परदेशात

येत्या २५ मेपासून १० जुलैपर्यंत सलमान खान शूटिंगसाठी कॅनडा, नेपाळ आणि अमेरिकेला जाणार आहे. रेस-३, किक-२, दबंग-३ आणि वाँटेड-२ या चित्रपटांचं शूटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. इंडस्ट्रीतलाच आकडा द्यायचा झाला, तर सलमान खानवर तब्बल ४०० कोटी रूपये गुंतले आहेत. मात्र, जर सलमान खान तुरुंगात गेला, तर या गुंतवणूकीचं काय होणार? हा मोठा प्रश्न आहे.


फक्त सलमानच ठरला दोषी

१९९८मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. त्यावेळी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी सलमान खानसोबत होते. या चौघांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते. मात्र, कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. मात्र, अटकेनंतर अवघ्या ४८ तासांमध्ये सलमान खान जामीनावर तुरूंगाबाहेर आला.


रेस-३मध्ये निगेटिव्ह भूमिका

लवकरच सलमान खानचा रेस-३ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे.



हेही वाचा

खरंच शिक्षा झाली?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा