Advertisement

दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनकच

दिग्दर्शक निशीकांत कामत यांच्या प्रकतीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू होत्या. पण कामत त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनकच
SHARES

मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर लय भारीचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनकच आहे. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त आहेत. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल उलट सुलटचर्चा सुरू होत्या. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

अभिनेता रितेश देशमुखनं देखील ट्विटरवर ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. रितेश म्हणाला की, निशीकांत व्हँटिलिटरवर आहेत. ते जिवंत असून लढा देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

निशीकांत कामत यांना डोंबीवली फास्ट, लय भारी आणि सातच्या आत घरात या मराठी चित्रपटांसह दृश्यम, फोर्स, फोर्स, रॉकी हँडसम आणि मदारी या चित्रपटांचं दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.

डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरलला होता. यानंतर मुंबई साखळी बॉम्बस्फोटावर आधारित ‘मुंबई मेरी जान’ या हिंदी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. यानंतर त्यांना दृश्यम, मदारी, फुगे अशा चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या.

जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांना व्हिलेनची भूमिका साकारली होती. त्यांनी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत भावेश जोशी या चित्रपटात देखील काम केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निशीकांत सध्या आपला आगामी चित्रपट दरबारसाठी काम करत होते. त्यांचा हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होऊ शकतो.



हेही वाचा

Gunjan Saxena The Kargil Girl Review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा