Advertisement

'पाताल लोक'नंतर अनुष्का घेऊन येतेय 'बुलबुल', 'या' तारखेला होणार प्रदर्शित

नेटफ्लिक्स ओरिजिनलवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

'पाताल लोक'नंतर अनुष्का घेऊन येतेय 'बुलबुल', 'या' तारखेला होणार प्रदर्शित
SHARES

'पाताल लोक' या क्राइम थ्रिलर वेब सीरिजनंतर अनुष्का शर्मा आता 'बुलबुल' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स ओरिजिनलवर हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच अनुष्कानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आगामी 'बुलबुल' या प्रोजेक्टची माहिती दिली. यासोबतच तिनं  पहिला लूक देखील शेअर केला आहे. तिनं लिहिलं की, “बुलबुलचा हा फर्स्ट लूक आहे. स्वत:चा शोध, न्याय, षड्यंत्र आणि रहस्यांची ही एक उत्कृष्ट कथा आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे.'



'बुलबुल'च्या फर्स्ट लूकमध्ये एक मुलगी तिच्या स्वप्नातील जगात झाडांवर उडी मारताना दिसत आहे. दिसणा-या मुलीचे पाय मात्र उलटे आहेत, ज्यावरुन हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यापूर्वीही अनुष्कानं तिच्या क्लीन स्लेट प्रॉडक्शन हाऊसमध्ये 'परी' हा हॉरर चित्रपट बनवला आहे. इतर स्टारनी केलेल्या पोस्टमध्ये 'बुलबुल' एक रहस्यमय कथा असल्याचं म्हटलं गेलं आहे. या चित्रपटात राहुल बोस, अविनाश तिवारी, पाओली दाम, परमब्रत चटर्जी आणि तृप्ती डिमरी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

अनुष्का शर्मानं तिचा भाऊ करणेशसमवेत 'पाताल लोक' ही वेब सीरिज तयार केली आहे. जी १५ मे रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'बुलबुल' 24 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. लवकरच त्याचा ट्रेलर रिलीज होईल.



हेही वाचा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराचं निधन

बोलक्या बाहुल्यांची धमाल, मराठी मालिका 'घरात बसले सारे'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा