Advertisement

१ हजार कंपन्या चीनला रामराम ठोकणार, भारतात येण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं आहे. बहुतांशी देश लाॅकडाऊन असल्याने याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जगभरातील उत्पादकांची पसंती असलेला चीनही यातून सुटलेला नाही.

१ हजार कंपन्या चीनला रामराम ठोकणार, भारतात येण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू
SHARES

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं आहे. बहुतांशी देश लाॅकडाऊन असल्याने याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जगभरातील उत्पादकांची पसंती असलेला चीनही यातून सुटलेला नाही. कोरोनामुळे चीनमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास 1 हजार कंपन्या चीनला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. या कंपन्या आता भारतात येण्याच्या विचारात आहेत. भारतात आपले कारखाने उभे करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारशी बोलणीही सुरू केली आहे.  या कंपन्यांशी बोलणी यशस्वी झाल्यास चीनला हा मोठा झटका असेल.

चीनमधून आपले कारखाने हलवण्याचा विचार करत असलेल्या कंपन्यांमध्ये ३०० मोबाइल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. भारतात कारखाने उभारण्यासाठी सरकारशी या कंपन्या संपर्कात आहेत. भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रात पर्यायी हब ठरू शकतो, असं या कंपन्यांना वाटत आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर आपला प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

यात विदेशातील भारतीय दुतावास आणि विविध राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा यात समावेश आहे. सध्या जवळपास १ हजार कंपन्या  इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल सेल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांशी चर्चा करत आहेत. या पैकी ३०० कंपन्यांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे, असं केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं. कोरोना नियंत्रणात आल्यावर आपल्यासाठी अनेक फलदायी गोष्टी समोर येतील. भारत हा उत्पादन क्षेत्रातील एक मोठा पर्याय म्हणून जागतिक पातळीवर समोर येईल. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारखे देश चीनवर प्रमाणापेक्षा अधिक अवलंबून आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.



हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा