Advertisement

12 लाख लोकांनी काढला पीएफ

२८ मार्चला ईपीएफओने कर्मचाऱ्यांना ईपीएफओमधून काही प्रमाणात पैसे काढण्यास मंजुरी दिली होती. कर्मचाऱ्यांना काढून घेतलेली रक्कम परत जमा करावी लागणार नाही.

12 लाख लोकांनी काढला पीएफ
SHARES
Advertisement

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच ठप्प आहेत. घरी बसावं लागल्यामुळे अनेकांची मोठा आर्थिक अडचण आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओमधून पैसै काढण्याची सवलत दिली आहे. याचा लाभ ईपीएफओच्या लाखो सभासदांनी घेतला आहे. आतापर्यंत १२ लाख सभासदांनी लॉकडाउनमध्ये ३,३६० कोटी रुपयांचा निधी काढला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली.

२८ मार्चला  ईपीएफओने कर्मचाऱ्यांना ईपीएफओमधून काही प्रमाणात पैसे काढण्यास मंजुरी दिली होती.  कर्मचाऱ्यांना काढून घेतलेली रक्कम परत जमा करावी लागणार नाही. मागील दोन महिन्यांत ईपीएफओच्या १२ लाख सदस्यांनी ३,३६० कोटी रुपयांचा निधी काढला आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत १२ लाख दाव्यांचा निपटारा केला आहे. ईपीएफओच्या सभासदांना तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याइतकी रक्कम किंवा आपल्या खात्यामध्ये एकूण जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम जी कमी असेल ती काढता येणार आहे. 

सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या कालावधीत २.२ कोटी बांधकाम कामगारांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत ३,९५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तत्पू्र्वी केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सर्व राज्यांना ५२,००० कोटी रुपयांच्या बांधकाम उपकरातून ३.५ कोटी कामगारांना वित्तीय मदत देण्याविषयी बजावले होते.

संबंधित विषय
Advertisement