Advertisement

अॅक्सिस बँकेला १५ हजार कर्मचाऱ्यांनी ठोकला रामराम

नवीन व्यवस्थापन, कार्यपद्धती तसंच कामाचा व्याप वाढल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या सेवांमधील बहुतांशी कर्मचारी आहेत.

अॅक्सिस बँकेला १५ हजार कर्मचाऱ्यांनी ठोकला रामराम
SHARES

खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेत मागील काही महिन्यांमध्ये राजीनामा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत बँकेला १५ हजार कर्मचाऱ्यांनी रामराम ठोकला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अनेक जुन्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. 

नवीन व्यवस्थापन, कार्यपद्धती तसंच कामाचा व्याप वाढल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या सेवांमधील बहुतांशी कर्मचारी आहेत. सध्याचे वर्क कल्चर जुन्या कर्मचाऱ्यांसाठी अवघड बनले आहे. यामुळे हे कर्मचारी राजीनामा देत आहेत. ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आदी नवीन तंत्रज्ञान स्विकारण्यास अपयशी ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंचा यामध्ये समावेश आहे. 

नुकतंच बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी जयराम श्रीधरन यांनी राजीनामा दिला होता. बॉण्ड ट्रेडिंगचे प्रमुख शशिकांत राठी,जेपी सिंग, सिरील आनंद यांनीही निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमर्चारी सोडून जाण्याचे प्रमाण १९ टक्के राहिले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १५ टक्के होते. सध्या बँकेकडून नवीन कर्मचारी भरले जात आहेत. चालू वर्षात बँकेने २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आणखी चार हजार कर्मचारी भरले जाणार आहेत. अॅक्सिस बँकेत ७२ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षात ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता.



हेही वाचा -

टाटा समूहात परतण्यात स्वारस्य नाही - सायरस मिस्त्री

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा