Advertisement

कोरोनामुळे 2.5 कोटी लोक बेरोजगार होणार

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेचा अहवाल चिंता वाढवणारा आहे. जगभरातील अडीच कोटी लोकांच्या नोकऱ्या कोरोनामुळे धोक्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे 2.5 कोटी लोक बेरोजगार होणार
SHARES

       कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा ( Work From Home) करण्याचा सल्ला दिला आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवले आहे.  तर काही कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता


       संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेचा अहवाल चिंता वाढवणारा आहे.  जगभरातील अडीच कोटी लोकांच्या नोकऱ्या कोरोनामुळे धोक्यात आल्या आहेत. प्रत्येक देशांच्या सरकारने योग्य पॉलिसी नाही राबवली तर संपूर्ण जगात बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.अहवालानुसार, कोरोनाचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे आणि मोठ्या प्रमाणात या बेरोजगारीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामाचे तास आणि पगारामध्ये कपात झाली आहे.

       जगभरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतं आणि त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, अशा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने दिला आहे. काही सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देखील मिळणं गरजेचं आहे. 2008-09 मध्ये ज्याप्रमाणे जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी पावलं उचलण्यात आली होती, त्याप्रमाणे काम केल्यास हे संकट टळू शकते. असंही आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने म्हटलं आहे.



      हेही वाचा -

      मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

      महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

      Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा