Advertisement

रंग बदलणारी २०० ची नोट!


रंग बदलणारी २०० ची नोट!
SHARES

गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आगमनासोबत बाजारात रंग बदलणारी २०० रुपयांची नोट दाखल हाेत आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार २५ ऑगस्ट रोजी आरबीआयकडून ही नोट बाजारात आणली जाईल.

या नोटेत रंग बदलणारी शाई वापरल्याने नोट हलवल्यास हिरव्या रंगाची अक्षरे निळी होतील. अंकाचाही रंग बदलेल. ही नोट बाजारात आल्यावर काळ्या पैशाला अंकुश बसेल, असे आरबीआयचे म्हणणे आहे.

नोटाबंदीनंतर बाजारात ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा आल्याने सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली. यामुळे १०० आणि ५० रुपयांच्या नोटांवर खूप दबाव आला. २०० रुपयांची नोट बाजारात आल्यास हा दबाव कमी होण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

उजळ पिवळा असा नोटेचा रंग असेल. या नोटेवर पुढच्या बाजूला महात्मा गांधी यांचा फोटो असेल, तर मागच्या बाजूला सांचीच्या स्तूपाची प्रतिमा असेल. नोटेवर इंग्रजी आणि देवनागरी लिपित २०० असे लिहिलेले असेल.


काय आहे वैशिष्ट्य

  • इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क
  • सिक्युरिटी थ्रेडवर आरबीआय, भारत
  • नोटेचा सिरियल क्रमांक चढत्या क्रमाने
  • नोटेचा आकार ६६ मिमी X १४६ मिमी
  • नोटेच्या डाव्या बाजूला नोट छापल्याचे वर्ष
  • मागच्या बाजूला 'स्वच्छ भारत'चा लोगो
  • अंधांसाठी नोटेच्या दोन्ही कोपऱ्यावर H चे चिन्ह



हे देखील वाचा -

अशी असेल... ५० ची नवी नोट!

200 च्या नोटेला एटीएमबंदी?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा