Advertisement

२६४ थकबाकीदारांनी थकवलं बँकांचं १. ०८ लाख कोटींचं कर्ज

देशातील अनेक मोठ्या थकबाकीदारांनी बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) थकीत कर्जाबाबत माहिती मागितली होती.

२६४ थकबाकीदारांनी थकवलं बँकांचं १. ०८ लाख कोटींचं कर्ज
SHARES

देशातील अनेक मोठ्या थकबाकीदारांनी बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. या थकबाकीदारांमधील २६४ मोठ्या थकबाकीदारांकडं (विलफुल डिफॉल्टर) बँकांचे तब्बल १ लाख ८ हजार काेटी रुपये थकीत आहेत. माहिती अधिकार कायद्याच्या उत्तरातून हे घक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे. 

पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) थकीत कर्जाबाबत माहिती मागितली होती. याबाबत आरबीआयने दिलेल्या उत्तरातून अधिकार देशातील १९१३ विलफुल डिफॉल्टरवर जून २०२० पर्यंत बँकांचे १.४६ लाख कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली. यामधील फक्त २६४ मोठ्या थकबाकीदारांकडं बँकांचे तब्बल १ लाख ८ हजार काेटी रुपये थकीत आहेत.

याबाबत वेलणकर म्हणाले की, २६४ विलफुल डिफॉल्टर्सवर १०० कोटी वा त्यापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे. २३ जणांनी १००० कोटींपेक्षा अधिक कर्ज थकवलं आहे. त्याची रक्कम ४३,३२४ कोटी आहे. ३४ जणांनी ५०० ते १००० कोटींपर्यंतचे कर्ज बुडवलेले आहे. १०० ते ५०० कोटींपर्यंतची थकबाकी असलेल्या २०७ डिफॉल्टर्सचा एकूण आकडा ४३,०९५ कोटी आहे. २६४ कर्जबुडव्यांवर एकूण १ लाख ८५२७ कोटींची थकबाकी आहे. बँकांनी ही कर्जाची वसुली करण्यासाठी त्यांच्यावर खटलेही दाखल केले आहेत.

हिरे व्यावसायिक मेहुल चाेक्सीने सर्वाधिक कर्ज थकवल्याचं समोर आलं आहे. कर्ज थकवणाऱ्यांच्या या यादीत हिरे व्यावसायिक मेहुल चाेक्सी कंपनी गीतांजली जेम्स लि. पहिल्या स्थानी आहे. या कंपनीकंड बँकांची ५,७४७.०५ कोटींची थकबाकी आहे. १५ व्या क्रमांकावरील विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सवर १३३५.२६ कोटी रुपये थकीत आहेत.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा