Advertisement

दुश्मन का दुश्मन दोस्त, एअरटेल-डिश टिव्ही देणार जिओला टक्कर?

टेलिकॉम सेक्टरनंतर आता जिओने एन्टरटेनमेंट सेक्टरमध्ये एन्ट्री केल्यामुळं सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यातच आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल डिटूएचचे प्रमुख सुनिल मित्तल यांनी एअरटेल डिटूएचला डिश टिव्हीसोबत मर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

दुश्मन का दुश्मन दोस्त, एअरटेल-डिश टिव्ही देणार जिओला टक्कर?
SHARES

टेलिकॉम सेक्टरनंतर आता जिओने एन्टरटेनमेंट सेक्टरमध्ये एन्ट्री केल्यामुळं सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यातच आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल डिटूएचचे प्रमुख सुनिल मित्तल यांनी एअरटेल डिटूएचला डिश टिव्हीसोबत मर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही बोलणी प्राथमिक टप्प्यात असून रिलायन्स जिओशी सामना करण्यासाठी या हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.


स्पर्धेत टिकण्यासाठी खटाटोप

जिओने यापूर्वी डेन नेटवर्क आणि हॅथवे केबल अँड डेटाकॉममधील या देशातील दोन मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा खरेदी केला होता. त्याकडं पाहता एअरटेलने स्पर्धेत टिकण्यासाठी मर्जरचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. एअरटेल आणि डिश टिव्हीचं मर्जर झाल्यास ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. परंतु या मर्जरबद्दल डिश टिव्ही आणि एअरटेल डिटूएचकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.


व्हिडिओकॉन, डिशचं मर्जर

यापूर्वी व्हिडिओकॉन डिटूएच आणि डिश टिव्हीचं मर्जर करण्यात आलं होतं. त्यानंतर डीटूएच सेक्टरमध्ये मर्जर झालेली ही पहिली कंपनी ठरली होती. सध्या भारतीय बाजारात ६ डिटूएच ऑपरेटर्स असून त्यापैकी डीडी ही मोफत सेवा पुरवणारी कंपनी आहे.


टाटा स्कायशीही चर्चा

एअरटेल डिटूएचने यापूर्वी टाटा स्काय या कंपनीकडे आपला व्यवसाय विकण्यासाठी चर्चा केली होती. परंतु दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर एअरटेलने आपल्या त्या कंपनीतला २० टक्के हिस्सा खाजगी कंपनी वॉरबर्ग पिंक्स या कंपनीला ३५ कोटी डॉलर्सला विकला होता.



हेही वाचा -

वरळी समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा