नव्या नोटांसाठी सर्वसामान्यांची धांदल


नव्या नोटांसाठी सर्वसामान्यांची धांदल
SHARES

मुंबई - सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत प्रत्येकानं नोटा बदलण्यासाठी घाई केल्यानं अनेक ठिकाणच्या बँकांमध्ये नव्या नोटांचा तुटवडा भासल्याचे चित्र पाहायला मिळालंय. नेहमी प्रमाणेच पोस्ट ऑफिसच्या रटाळ कारभाराचा फटका ग्राहकांना यावेळीही बसला.

लोअर परेलमध्ये देना बँकेबाहेर तर रांग लावण्यावरून ग्राहकांमध्ये मारहाण झाल्याचे पाहायला मिळालं. येस बँकसारख्या अगदी मोजक्या बँकांची एटीएम खुली ठेवण्यात आली होती. मात्र लोकांनी अनेक ठिकाणी घाई घाईत पैशांचे व्यवहार केल्यामुळे एटीएमधील पैसे संपले. त्यामुळे एटीएम दुपारपर्यंत बंद करण्यात आले. वरळी विभातही काही बँकामध्ये डिपॉझीट फॉर्म संपले होते. तर वरळीच्या बीडीडी चाळ परीसरात असलेल्या अभ्युदय बँकेत व्यवहारासाठी वापरली जाणारी कॅश संपल्याचे अनुभव देखील लोकांना आले. काही सर्वसामान्य लोकांनी लोकांनी मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केलं. तर काहींना ऑफिस बुडवून बँकेत यावं लागलं त्यामुळे मनस्ताप झालाय.

संबंधित विषय