Advertisement

एंजल ब्रोकिंगची मोठी मजल, बनलं देशातील चौथ्या क्रमांकाचं ब्रोकरेज हाऊस

भारतीय ब्रोकिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करत एंजल ब्रोकिंग हे ब्रोकरेज फर्म देशातील चौथ्या क्रमांकाचं ब्रोकरेज फर्म बनलं आहे.

एंजल ब्रोकिंगची मोठी मजल, बनलं देशातील चौथ्या क्रमांकाचं ब्रोकरेज हाऊस
SHARES

भारतीय ब्रोकिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करत एंजल ब्रोकिंग हे ब्रोकरेज फर्म देशातील चौथ्या क्रमांकाचं ब्रोकरेज फर्म बनलं आहे. या ब्रोकरेज फर्मने मिळवलेल्या यशामागे टेक्नोसॅव्ही आणि डिजिटल व्यवहार करणारे ग्राहक आहेत. मार्च २०२० पासून एंजल ब्रोकिंग सरासरी १ लाख नव्या ग्राहकांना जोडत आहे. मागील वर्षभरात ब्रोकरेज फर्मने अनेक पुरस्कार मिळ‌वले आहेत. (angel broking firm becomes 4th largest broking firm in india)

एंजल ब्रोकिंगची ही कामगिरी म्हणजे फर्मचे संपूर्ण डिजिटल परिवर्तन आणि अभिनव दृष्टीकोन यांचा परिणाम आहे. गुंतवणुकीची सुरूवात करण्यांना एंजल ब्रोकिंगसोबत खाते उघडण्यासाठी तसंच ट्रेडिंग सुरू करण्यासाठी (केवायसीचे पालन करणारे ग्राहक ) १५ मिनिटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. प्लॅटफॉर्म मोफत इक्विटी डिलिव्हरी ट्रेडसह इंट्रा डे, एफ अँड ओ ट्रेड, कमोडिटी आणि चलन यासाठी फक्त २० रुपये शुल्क आकारले. यात आणखी भर म्हणजे, भारतभरातील मिलेनिअल पिढीनुसार, एंजल ब्रोकिंगचा नावीन्यपूर्ण मार्केटिंग अॅप्रोच आहे.

हेही वाचा - 'ह्या' बँका आकारणार मिनिमम बॅलन्सवर शुल्क

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी म्हणाले, “ एंजल ब्रोकिंगमध्ये आमच्या ग्राहकांसाठी युनिक आणि नावीन्यपूर्ण अनुभव निर्माण करणे, यावर आमचा सतत भर असतो. आमच्या शक्तीशाली, परंतु वापरण्यास सोप्या अशा प्लॅटफाॅर्मवर अखंड, डेटा आधारीत गुंतवणुकीचा अनुभव मिळतो. तसंच आम्ही इक्विटी गुंतवणूक अश्विसनीय बनवण्यासाठी सतत नव्या कल्पनांना चालना देतो. वृद्धीतील नवा मैलाचा दगड गाठल्याबद्दल आम्हाला अअभिमान आहे. एंजल ब्रोकिंग या ब्रँडवर विश्वास ठेवल्याबद्दल आमचे सर्व व्यापारी/ गुंतवणूकदार आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो.”

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले, “स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी गुंतवणूकदारांची पहिली पसंती होण्याकरीता आम्ही एक पारंपरिक ब्रोकरेज फर्मच्या संकल्पनेपासून मोठी झेप घेतली आहे. मार्च २०२० पासून आम्ही दरमहा सरासरी १ लाख नवीन खाती जोडली आहेत. नजीकच्या भविष्यात रिटेल स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात बाजाराचं नेतृत्व करण्यासाठी हा वृद्धी दर असाच गतिमान ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.”

भविष्याचा वेध घेणाऱ्या या ब्रोकरेज फर्मने प्लॅटफॉर्मवर ‘अँप्लिफायर्स’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण सुविधा दिली आहे. याद्वारे ती या उद्योगातील गेम चेंजर ठरत आहे. ही भारतीय इन्फ्लुएंसर्सना ब्रोकरेज फर्मसोबत थेट भागीदारी करण्यास सक्षम करते. शेवटच्या ग्राहकांपर्यंत संदेेश पोहोचावा, हा मोहिमेमागील हेतू आहे. एंजल ब्रोकिंग कंटेंट कोलॅबरेटर्सना पॉडकास्ट, वेबिनार्स, ट्रेनिंग सेशन्स इत्यादीच्या माध्यमातून चांगले शिकण्याची संधी देऊ करते.

हेही वाचा - मुकेश अंबानींची संपत्ती देशातील ९ राज्यांच्या जीडीपीइतकी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा