अडचणींची टोपली

माहीम - नोटबंदीचा सर्वात जास्त फटका बसलाय तो छोट्या- मोठ्या कारागिरांना. हे कारागीर दिवसभर मेहनत करून थोड्याफार कमाईवर आपल्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र नोटबंदीला 49 दिवस पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या अडचणी अजूनही कमी होत नाहीयेत.

दादरमधील या कारागिरांनी बनवलेल्या टोपल्या नाशिक, गोवा आणि पुण्यासारख्या शहरात विक्रीसाठी पाठवल्या जातात. तरीही यांना दोन पैसे मिळवण्यासाठी, रोजच्या जगण्याची लढाई लढण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो आहे. परिस्थितीत लवकरच तोडगा निघाला नाही, तर यांच्या कुटुंबियांचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

Loading Comments