Advertisement

उद्योजक अनंत बजाज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


उद्योजक अनंत बजाज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
SHARES

विख्यात उद्याेगपती राहुल बजाज यांचे पुतणे अाणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मुंबईत निधन झालं. शुक्रवारी संध्याकाळी अनंत बजाज यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर रूग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ४१ वर्षांचे झाले. शनिवारी सकाळी काळबादेवी येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अाले.


अनंत बजाज यांची अोळख

अनंत बजाज यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी हसाराम रुजूमल कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅँड इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅँड रिसर्च, मुंबई इथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. १९९९ मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून अापल्या कारकिर्दीला सुरुवात केली.


रांजणगाव येथे प्लांट उभारला

२००१ मध्ये रांजणगाव येथे कंपनीचा प्लांट उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनंत बजाज यांच्या पश्चात आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण असा परिवार आहे.


हेही वाचा -

रेकाॅर्ड ब्रेक! सेन्सेक्स पहिल्यांदाच ३८ हजारांच्या वर

कर्जाचा हप्ता महागणार; अारबीअायची रेपो दरात वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा