Advertisement

बँकांचा एनपीए दुप्पट हाेण्याचा अंदाज

काेराेनामुळे देशात लाॅकडाऊनला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांचा एनपीए या वर्षाच्या अखेरपर्यंत दुप्पट हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बँकांचा एनपीए दुप्पट हाेण्याचा अंदाज
SHARES

काेराेनामुळे देशात लाॅकडाऊनला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांचा एनपीए या वर्षाच्या अखेरपर्यंत दुप्पट हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकांकडे जवळपास ९.३५ लाख रुपयांचे थकीत कर्ज अडकले आहे. हे बँकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत ९.१ टक्के आहे.चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत बँकांचा एनपीए वाढून ताे १८ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. जेष्ठ सरकारी अधिकारी आणि अव्वल बँकर्सच्याम्हणण्यानुसार, या वेळी २० ते २५ टक्के थकीत कर्ज डिफाॅल्ट हाेण्याचा धाेका आहे. बुडीत कर्ज वाढल्यास पतवृद्धीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबराेबर काेराेनातून आर्थिकदृष्ट्या सावरण्यातही विलंब लागू शकताे.

ही अनिश्चितता कायम आहे. बँका मागील तिमाहीच्या तुलनेत या वेळी दुप्पट एनपीए रक्कम जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वित्तीय प्रमुखाने नुकतंच म्हटलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा