Advertisement

ऑक्टोबरमध्ये ११ दिवस बँका बंद


ऑक्टोबरमध्ये ११ दिवस बँका बंद
SHARES

ऑक्टोबर महिन्यात बँका तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात असलेल्या सणांमुळे बँकांना एवढ्या दिवस सुट्टी असेल. २ ऑक्टोबरला पहिली सुट्टी असेल. त्यानंतर भाऊबीजला शेवटची सुट्टी असणार आहे.  म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बँकांचं कामकाज फक्त २० दिवस चालणार आहे. 

महात्मा गांधी  जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला बँका बंद असतील. त्यानंतर ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरला सलग तीन दिवस बँकांचं कामकाज बंद असेल. ६ ऑक्टोबरला रविवारची सुट्टी, ७ ऑक्टोबरला महानवमी आणि ८ ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे बँका बंद असतील. 

यानंतर १२ ऑक्टोबरला दुसरा शनिवार असल्यामुळे आणि १३ ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. २० ऑक्टोबरला रविवारी बँकांचं कामकाज बंद असेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे या आठवड्यात सलग ४ दिवस सुट्टी असेल. महिन्याचा चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला बँका बंद आहेत. तर २७ ऑक्टोबरला रविवार आणि दिपावली आहे. २८ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज आहे.  त्यामुळे या दोन्ही दिवशी बँका बंद असतील. अशा एकूण आॅक्टोबरमध्ये बँकांचं कामकाज ११ दिवस बंद असेल. त्यामुळे बँक ग्राहकांनी आपली महत्त्वाची कामे लवकरात लवकर केल्यास मनस्ताप होणार नाही. 



हेही वाचा -

पीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा